बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2024 (15:14 IST)

भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

sharad panwar
सध्या राजकारणात पक्षांतर होण्याच्या बातम्या समोर येत असताना आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांची जय्यत तयारी सुरु आहे. भाजपने राष्ट्रवादीत फूट टाकण्याच्या आरोप करणे सुरु आहे. आता शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असून भाजपचा बडा नेता आता राष्ट्रवादीच्या पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या चर्चेत आहे. माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून भाजप पासून दूर झाले आहे. हरिशचंद्र हे भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपने हरिश्चंद्र यांची उमेदवारी काढून भारती  पवार यांना उमेदवारी दिली असून ते पक्षावर नाराज होते.

आता हरिशचंद्र  चव्हाण आणि भाजपच्या विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार हे अमोर-समोर मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरीशचन्द्र हे आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा बातम्या येत आहे.ते लवकरच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, अशा परिस्थितीत भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो. चव्हाण हे कधी जाहीर प्रवेश करणार हे पाहण्या सारखे आहे. 
 
 Edited by - Priya Dixit