शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (10:13 IST)

आदित्य ठाकरे विरोधात एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

aditya thackeray
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर डिलाई रोज ब्रिजच्या लेनचे उदघाटन केल्याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

डिलाई रोज ब्रिजच्या लेनचेकाम अपूर्ण असून देखील  उदघाटन करण्याबाबत त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंट कडून तक्रार दाखल करण्यात आली .

आदित्य यांच्यासह उद्धव, शिवसेना नेते सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध मुंबईतील एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोअर परेल येथे असलेल्या डेलिसल ब्रिजचे या लोकांनी परवानगी न घेता उद्घाटन केल्याचा आरोप आहे. याबाबत बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले, तरीही आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 16 नोव्हेंबर रोजी पुलाचे उद्घाटन केले.
गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डिलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्धाटन करण्यात आले होते.

या विरोधात आता मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे.काम पूर्ण झाल्यावर सात दिवसांनंतर लेन सुरु करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलं असून बेकायदेशीरपणे उदघाटन केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिकेने केला आहे. उदघाटनानंतर त्या पुलावरून वाहतूक देखील आदित्य ठाकरे यांनी सुरु केली आहे. 

या वर आदित्य ठाकरे म्हणतात. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून पुलाचे उदघाटन होते नाही. लोकांची कोंडी किती दिवस करायची म्हणून लोकांची कोंडी होऊ नये या साठी उदघाटन केलं. 
 






 Edited by - Priya Dixit