शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:47 IST)

आव्हाड आणि त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

jitendra awhad
हर हर महादेव या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. याप्रकरणी डॉ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तक्रारदार परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, ते आणि त्यांची पत्नी हर हर महादेव हा सिनेमा पाहण्यासाठी विवियाना मॉलमध्ये सिनेमागृहात गेले होते. सिनेमा चालू असताना माजी मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते तो चित्रपट बंद पाडण्याच्या उद्देशाने सिनेमागृहात आले. त्यांनी “चित्रपटामध्ये चुकीचे दृष्य दाखवले जात असल्याने हा चित्रपट बंद करा” असे बोलून चित्रपट बंद पाडला. त्यावेळी चित्रपट पहाणाऱ्यापैकी कोणीतरी इसमाने “असे कसे कोणीही एैरा गैरा येईल व चित्रपट बंद पाडेल” असे बोलला. त्याचा राग मनात धरून चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते प्रेक्षकांच्या अंगावर धावून आले. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी हे प्रथम असल्याने जमावातील ८ ते १० लोकांना त्यांना व त्यांची पत्नी अशा दोघांना धक्काबुक्की केली. यामुळे जितेंद्र आव्हाडांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor