शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:03 IST)

खासदार शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

A case has been registered against the woman who blackmailed MP Shewale
मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकावणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती.
 
न्यायालयाच्या आदेशानंतर आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे तसेच ब्लॅकमेल करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
दरम्यान राहुल शेवाळे यांच्यावर संबंधित महिलेने 3 महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता.