सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (21:32 IST)

पाच रुपयांची कटलेली पतंग जिवावर बेतली

नाशिक शहरात कटलेल्या पतंगामागे पळतांना रस्त्यावर पडून एक मुलगा जखमी झाला होता. त्याच मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अकीब रफीक बागवान असे मृत्यू झालेल्या 13 वर्षीय मुलाचे नाव आहे. नाशिकच्या भारतनगर परिसरातील ही घटना असून अकीब जखमी झाल्यापासून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
मकर संक्रातीला पतंग उडविणे, पतंग काटने अशी स्पर्धाच सुरू असते. त्यानुसार पतंग कटलेल्या अवस्थेत असतांना तिला पकडण्यासाठी मुलं धावत असतात. अशीच कटलेली पतंग पकडण्यासाठी धावत असतांना एका मुलगा रस्त्यावर पडला होता, बुधवारी अकीब बागवान नावाचा मुलगा जखमी झाला होता. तो पडलेल्या अवस्थेत पाहून त्याला त्याच्या ओळखीच्या व्यक्तींनी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. अकीबला दम लागल्याने तो खाली पडला होता त्याचवेळी डोक्याला जबर मार लागला. अकीबवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor