रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (17:01 IST)

रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा खळबळजनक प्रकार

संगमनेर येथे रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी एका रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतले असून जवळपास देशी दारुच्या ५ बॉक्ससह एकूण २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
 
जिल्ह्यात संचारबंदी सुरू असल्याने पोलीस प्रशासन ठिकठिकाणी नाकेबंदी करून संशयास्पद वाहनांची चेकिंग करत आहे.
बसस्थानकाजवळील तपासणी नाक्यावर आज सकाळपासूनच पोलिसांकडून नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी सुरु असताना नाशिककडील रस्त्याच्या बाजूने भरधाव वेगाने सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली.
मात्र दूरवरुन सायरनचा आवाज आला नाही, मात्र सदरचे वाहन जवळ येताच सायरन का वाजला? असा प्रश्‍न यावेळी तपासणी नाक्यावर उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पडला.
 सदर रुग्णवाहिका नाक्याजवळ येताच पो.नि.देशमुख यांनी रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस कोणीही रुग्ण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यावरुन त्यांनी सदर वाहनाला थांबवून रुग्णवाहिकेची तपासणी करण्यास सांगितले असता देशी दारुचे ५ बॉक्स पोलिसांना आढळून आली.
सदरच्या रुग्णवाहिकेतून तब्बल २३ हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची दारु जप्त करून संगमनेर पोलिसांनी रुग्णवाहिकाचालक विजय खंडू फड (वय 42, रा.साईदर्शन कॉलनी, मालदाड रोड)
व कैलास छबुराव नागरे (वय 49, रा.शेडगाव) या दोघांना ताब्यात घेतले असून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.