शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (09:36 IST)

संतापजनक, हॉस्पिटलची अम्बुलन्स रुग्णासाठी नाही तर कपाट वाहतुकीसाठी ?

पुणे व पिंपरी चिंचवड आणि शहरालगत ग्रामिन भागात करोनाच्या रुग्नाची वाढती संख्या चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना रुग्नाला व्हेंन्टीलेटर बेड उप्लब्ध होत नाही. अँम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. या जनसामान्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. पण पुण्यात तरुन पत्रकार पांढूरंग रायकर याचा अँम्ब्युलन्स उप्लब्ध न झाल्याने बळी गेल्यावर कोरोनाने सामान्याच्या होत असलेल्या हालअपेष्टा वास्तवाची जाणीव झाली आहे.
 
देहुरोड बोर्डाला कार्डीयाक अँम्बुलन्स खासदार नीधीतून देण्यात आली त्या अँम्ब्युलन्समध्ये आवश्यक साधनसामुग्रीसाठी जवपास १२ ते १३ लाख रुपये देहूरोड कँन्टामेंन्ट बोर्डाने खर्च केला. मात्र, त्या अँम्ब्युलन्सचा वापर रुग्णासाठी करण्याऐवजी कपाट वाहातुकीसाठी केला जात असल्याचा विडीओ समोर आला आहे.
 
त्याच पुण्यात अँम्ब्युलन्स न मिळाल्याने अनेकाचे जीव जातात याला काय म्हणायचे?.असा प्रश्न सर्व स्थरातून विचारला जात आहे. देहुरोड बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी काय करतात? देहुरोड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्नासाठी अथवा रुग्नासाठी अँम्ब्युलन्ससाठी फोन केला तर सेवा देण्यास नकार दिला जातो. हे दुर्दैवी आहे. या नागरी प्रश्नाकडे मुख्यकार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरीतवाल लक्ष घालतील का? असा प्रश्न मानवी हक्क कार्यकर्ते मेहरबानसिंक तख्खी, विकास कुचेकर यांनी केला आहे.