अनोखे उदाहरण: माकडाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी ट्रक्टरमधून काढली अंत्ययात्रा
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात एका माकडाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्याची ट्रक्टरमधून अंत्ययात्रा काढली आणि त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील बाकरवाडी गावात घडली आहे.अक्कलकोट पाणीपुरवठा पंप हाऊसजवळ गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका माकडाचा वीजेचा धक्क्याने मृत्यू झाला. खरीप पिकांच्या काढणीला वेग आल्यामुळे गावातील शेतकरी, मजूर लोक शेताकडे गेले होते. संध्याकाळी हा प्रकार समजला.
त्यानंतर मृत माकडाला ट्रॅक्टरमधून गावात आणले. त्यानंतर धार्मिक रिवाजानुसार त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घातले. त्याची पूजादेखील करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावभर अंत्ययात्रा काढण्यात आली. जसजशी अंत्ययात्रा पुढे जात होती, गावातील महिला त्या ट्रॅक्टरसमोर येऊन माकडाची ओवाळणी करत होत्या, अंत्ययात्रेत सहभागी होत होत्या. तर काही नागरिक ट्रॅक्टरच्या पुढे भजन गात होत्या. ही अंत्ययात्रा गावातील हनुमान मंदिराजवळ येऊन थांबली. तिथे मंदिराच्या पायरीजवळ मोठा खड्डा खणण्यात आला होता. या खड्ड्यात रितीरिवाजानुसार माकडाचे अंत्यविधी करण्यात आले.