शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (09:42 IST)

सिन्नर तालुक्यात वन विभागाने घडवून आणली मादी बिबट्याची आणि ३ बछड्यांची भेट

leopard
सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे बिबट्याच्या ३ बछड्यांची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आण्यात वन विभागाला यश आले आहे. वनविभागाने लावलेल्या नाईट व्हिजन कॅमेरात ही भेट कैद झाली आहे.
 
माळेगाव येथील शेतकरी रामचंद्र काकड यांच्या शेतात सकाळी ऊसतोड चालू असताना बिबट्याचे तीन बछडे शेतकऱ्यांना सापडले. त्यानंतर त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. सायंकाळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या तीन बछड्यांना त्याच ठिकाणी टोपली खाली ठेवले.
 
या ठिकाणी निरीक्षण ठेवण्याकरिता नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरा लावला. त्यानंतर काही वेळात मादी तीन पिलांना सुखरूप घेऊन जाताना कॅमेरा मध्ये कैद झाली. वनविभागाचे उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रा.) मनीषा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे सिन्नर येथील वनपाल एस.एम.बोकडे, श्रीमती व्ही टी कांगणे, मधुकर शिंदे, रोहित लोणारे, रवी चौधरी यांनी ही कामगिरी केली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor