शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (16:54 IST)

शेतात आग लागून 100 एकर ऊस जळून खाक

यंदा बळीराजावर संकट कमी होण्याचं नावच घेत नाही. अवकाळी पावसामुळे शेकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उसाची लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे ऊस आता काढणीला आलेले असता उसाच्या शेतात लागलेल्या आगीत सुमारे 100 एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात फळा आणि सोमेश्वर शिवारात  घडली आहे. शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत 100 एकर ऊस जळून खाक झाला. आग एवढी भीषण होती आणि वेगाने पसरली त्यामुळे शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दल येई पर्यंत आग वेगाने पसरत गेली.आणि या आगीत  फळा आणि सोमेश्वर गावातील सुमारे 50 शेतकरी बांधवांचा ऊस जळून खाक झाला. या शेतकऱ्यांचे 1 कोटीपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.
 
शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली आणि या आगीने रौद्र रूप धारण करत वेगाने पसरत गेली आणि पाहता पाहता या आगीने 100 एकर उसाला जाळून खाक केले. 
आग विझविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला परंतु आगीचे लोळ उंच होते आणि वाळलेल्या पाचटीमुळे आग विझवता आली नाही. आणि आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरली आणि पाहता पाहता 100 एकर ऊस जळून खाक झाला. 

या मुळे शेतकरी हवालदिल झाला असून घटनास्थळी पालम पोलीस ठाण्याचे प्रदीप काकडे पोहोचले. या परिसरात आणखी 200 एकर ऊस असल्याची माहिती देण्यात आली आहे.