गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2024 (09:54 IST)

गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला लागली आग, मोठा अनर्थ टळला

fire
शहरालगत असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातुन भुसावळ कडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे गार्ड च्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र बोगी मध्ये नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
 
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिनस वरून -गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस शुक्रवारी दुपारी नेहमी प्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकात आली. पुढे स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक, मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळून गोदान एक्सप्रेस जात असतांना गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगी मधून आगीचे लोट येऊ लागले.शेजारील बोगी मधील प्रवासीच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केला.
 
त्यानंतर गाडीच्या गार्डला समाजल्या नंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली. गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. दरम्यान तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले. मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्याना घटनास्थळी पोहचण्यात कसरत करावी लागली. तो पर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला.
 
अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगी वर पाणी मारणे शक्य नव्हते. अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ रेल्वेपासून आगीने बाधित झालेली बोगी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. बोगी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली.
 
या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही, जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.या घटनेची उच्च सत्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor