1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (07:51 IST)

राज्यात तीन पक्षांचं सरकार, बिघाडीही होऊ शकते

bachhu kadu
A government of three parties in the state may also fail 10 दिवसानंतरही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून महायुतीच्या सरकारची गुंतागुंत वाढतच चालली आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
 
दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या सरकारच्या भवितव्याबद्दल सूचक विधान केलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडीही होऊ शकते. तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनाही सत्तेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “सध्या थोडा खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल, असं मला वाटतं. मी याआधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकते आणि तीन तिघाडा म्हणून बिघाडाही होऊ शकतं. बिघाडा होऊ नये, यासाठी बैठका सुरू असतील.