रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 एप्रिल 2021 (11:33 IST)

गर्लफ्रेन्ड अन् बॉयफ्रेंडनं सुरू केला होता ‘गोरख’ धंदा ! पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वसई येथे किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मॅकेनिकल इंजिनिअर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने अटक केली आहे. या हायप्रोफाईल रॅकेटमधील ४ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.
 
पोलिसांनी सांगितल्यानुसार, वसई पश्चिमेकडील नवघर माणिकपूर एसटी बस डेपो जवळ एक महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींना घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक केली.
 
जिया जावेदकर आणि संदीप पाल, अशी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांची नावे आहेत. हे दोन्ही प्रियकर आहेत. संदीप OLX वर नोकरी शोधणाऱ्या सुशिक्षित मुलींना पर्सनल सेक्रेटरीची नोकरी देण्याचे सांगून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असे. वसई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.