मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :रत्नागिरी , बुधवार, 17 मार्च 2021 (10:37 IST)

रत्नागिरीत रोह्यातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग

रत्नागिरीतील रोह्यातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्यामुळे आगीत दुकान पुर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. रोहा अष्टमी नगर परिषद समोरील भूमिका कलेक्शन ह्या प्रसिद्ध कपड्याच्या दुकानाला पहाटे च्या दरम्यान भीषण आग लागली  असताना घटनास्थळी लागलीच रोहा नगरपरिषद अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग विझविण्यात आली.
 
परंतु पहाटे ४.३० वा. सुमारास आग लागुन दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविले परंतु त्या आगोदर दुकान पुर्ण पणे जळुन खाक झाले. घटनास्थळी उपनगराध्यक्ष. महेशजी कोल्हटकर, नगरसेवक मयूर दिवेकर,नगरसेवक राजू जैन यांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले.

आगीमध्ये दुकान मालकाचे सुमारे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाल्याचा अदांज व्यक्त करण्यात येतोय.