शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (14:36 IST)

वीज कोसळल्याने 27 शेळ्या ठार झाल्या

यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळल्याने 27 शेळ्या ठार झाल्या आहेत. शेळ्या ठार झाल्यामुळे 13 शेतकऱ्य़ांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत.
 
यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील खातेरा शेत शिवारात बुधवारी दुपारी साडेचार च्या दरम्यान वीज कोसळली. यात तब्बल सत्तावीस शेळ्या जागीच ठार झाल्या. बुधवारी दुपारी वातावरण चांगले असल्याने खातेरा गावातील शेळ्या घेऊन गुराखी चारण्यासाठी जंगलात गेले होते. तेव्हा आभाळात अचानक ढग दाटुन आले व जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने सर्व शेळ्यानी लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. याच लिंबाच्या झाडावर वीज कोसळली व तब्बल सत्तावीस शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. 
 
सुदैवाने गुराखी बाजूला असल्याने बचावले. शेळ्या ठार झाल्याने शेळी पालक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचानामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्य़ांनी केली आहे.