शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:46 IST)

बंडखोरांसमोर नवा पर्याय? एकनाथ शिंदेंनी केला राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन

eknath shinde
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. ज्यामध्ये राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आलीय. शिंदे यांनी पुन्हा त्यांना काॅल केल्याने ते मनसे गटात सामील होणार का अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आले आहे. त्यातच आज १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राज ठाकरे यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलायं. शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्याचं राज यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली.या फोन कॉलदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरेंना राजकीय घडामोडींसंदर्भातील माहिती देताना आपली बाजूही सांगितल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.