रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:28 IST)

साईभक्ताने दिले सोन्याच्या पाच लाखाच्या बासरीचे दान

शिर्डी येथे राहुन जगाला श्रंध्दा आणी सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या चरणी नेहमीचं दानशूर साईभक्त सोने-चांदी आणि हिरे मोती यांचे दान मोठ्या प्रमाणावर देत असतात . बाबांच्या सिंहासनासह मंदिरातील गाभारा व अन्य सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे भाविक आता साईंच्या चरणी आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं सोन दान करत असतात . दिल्ली येथील साईभक्त ऋषभ लोहिया यांनी साईचरणांवर आकर्षक अप्रतिम कारागिरी केलेली सोन्याची बासरी दान स्वरूपात अर्पण केली आहे. साईंच्या धूपारती नंतर बाबांना ही बासरी भेट देण्यात आली आहे.

या बासरीचे वजन वजन १०० ग्रॅम आहे. तर किंमत ४ लाख ८५ हजार रुपये सांगितली जात आहे शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत भाविकांना अनेक रुपात दर्शन दिले आहे, असे सांगितले जाते.  भाविक आपल्या मनातील भक्तीप्रमाणे बाबांना मानून दर्शन घेतात.दिल्ली येथील साईभक्त ऋषभ लोहिया यांची अनेक दिवसांची साईबाबांना सोन्याची बासरी भेट देण्याची मनोकामना होती. त्यानुसार त्यांनी अतिशय सुबक आणि आकर्षक हुशार कारागीराकडून सुवर्ण बासरी तयार करून घेतली. दहा तोळ्याच्या असलेल्या बासरीवर सारे, ग ,म ,पा , या पाच सुरांचे छिद्र असून मनमोहक सजावट करण्यात आली आहे. बाबांच्या धूपारती नंतर साईंना ही बासरी भेट देण्यात आली आहे.

दिल्लीतील साईभक्ताने शिर्डी येथे साईमंदिरात साई बाबांना अर्पण केलेली बासरीसाईबाबांच्या मंदिरात अनेक सण उत्सव साजरे होतात त्याचप्रमाणे श्रीरामजन्म आणि श्रीकृष्ण जन्मालाही पाळणा हालवला जातो. परंपरेन सुहासिनी पाळणा गातात व समाधी मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साईसंस्थान कडून साजरा होतो. यावेळी लाकडी बासरी ठेवण्यात येत होती. मात्र, आता साईंना सोन्याची बासरी पहिल्यांदा साईबाबा ना दानात आल्यानं यापुढे सुवर्ण आणि आकर्षक बासरी वापरली जावू शकते काही दिवसापूर्वी एका साईभक्त भाविकांने आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी ३३लाख रुपये किमतीचे सुवर्ण मुकुट दान केला होता कोव्हीड काळात दोन वर्षे साईबाबांच्या दानपेटी वर मोठा परिणाम झाला होता मात्र आता कोरोणाचे सर्व नियम शिथिल झाल्यामुळे व देशातील बाजारपेठ सुरळीत होत असल्याने शिर्डी शहरात साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्त भाविकांकडून दान वाढत आहे.