सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (18:26 IST)

पूर आलेल्या नदीला पुलावरून ओलांडताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली, 6 जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील नागपूर आणि विदर्भ भागात अतिवृष्टी सुरु आहे.नद्यांची पातळी वाढून नदीला पूर आला आहे. नागपुरातील केळवद येथे बामनमारी नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून गाडी नेताना पुरात गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात सहा जण वाहून गेले आहेत. त्या पैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे. तर तिघांचा शोध अद्याप सुरु आहे.