गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (11:31 IST)

ट्रक-बॅलेरोच्या अपघात, 5 जणांचा मृत्यू, 6 जखमी

accident
ट्रक आणि बॅलेरोच्या झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील मुंबई नागपूर महामार्गावर नशिराबाद गावाजवळ घडली आहे. 
जळगावातील फैजपूर बाजारासाठी बकऱ्या घेऊन निघालेल्या बॅलेरो पिकअप वाहनाला रॉंग साईड ने येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक देऊन उडवले. या अपघाता नंतर या अनियंत्रित ट्रक ने एका अजून वाहनाला धडक दिली आणि या अपघातात पाच जण मृत्युमुखी झाले. तर सहा जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं .