शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (21:53 IST)

पांढऱ्या तोंडाचा कोब्रा नांदगावात आढळला

नाशिकात दहेगाव चौफुलीत बाळकाका कलंत्री काट्यासमोर दशरथ शिंदे यांचे चहाचे हॉटेल आहे. त्यामागे शेत आहे. हॉटेलच्या मागे दशरथ शिंदे यांना एका भलामोठा पांढरा साप जाताना दिसला. त्यांनी लगेच सर्पमित्राला फोन करून स्पा बद्दल सांगितले. सर्पमित्र विजय बडोदे हे त्या स्थळी पोहोचले आणि त्यांनी ज्या दगडाच्या खाली साप लपला होता ते बाजू केले तर त्यांना हा वेगळा प्रकारचा साप असल्याचे समजले.हा भलामोठा साप कोब्रा होता. हा विषारी असतो. त्यांनी सावधगिरीने नागाचे रेस्क्यू केले. हा नाग जवळपास चारफुटी होता. त्याच्या तोंडाकडे जखमा झाल्या होत्या. मुंगूसच्या तावडीतून हा वाचलेला असावा. त्याचे तोंड पांढरे पडले होते. 

विजय यांनी अनेक सापांचे रेस्क्यू केले आहे. मात्र अशा प्रकारचा साप त्यांनी प्रथमच पहिला होता. सापाबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून त्यांनी सापाचे काही छायाचित्र सर्पाचा अभ्यास करणारे राहुल शिंदे यांना पाठविले. राहुल यांनी सांगितले की या सापाचे तोंड मुंगूसने फाडले आहे आणि आता हा शिकार करण्यास असक्षम असे. त्याला योग्य पोषण मिळाले नाही म्हणून त्याच्या शरीरातील मेलानिन चे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा रंग पांढरा झाला आहे. किंवा हा साप पूर्वी पासूनच पांढराच असू शकतो. त्याच्यातील मेलेनिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याच्या त्वचेचा रंग कमी होऊन तो पांढरा झाला.  बडोदे यांनी सापाला पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेऊन त्याच्यावर उपचार केले नंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. 
 
 
Edited by - Priya Dixit