गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (12:47 IST)

घरात साप सोडून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्या नराधमाला अटक

snake
ओडिशातील गंजाम जिल्ह्यात पोलिसांनी एका व्यक्तीला त्याच्याच घरात विषारी साप सोडून त्याच्या दोन वर्षांच्या मुलीची आणि पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गणेश पात्रा (वय 25 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे.
 
गंजम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बेरहामपूरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कबीरसूर्या नगर पोलिस स्टेशन हद्दीतील अधेगाव येथे घडली. गणेशवर त्याच्या घरातील खोलीत विषारी साप आणून दीड महिन्यापूर्वी खुनाच्या उद्देशाने घराच्या खोलीत सोडल्याचा आरोप आहे, ज्याच्या दंशामुळे त्याची 23 वर्षीय पत्नी के बसंती पात्रा आणि दोन वर्षांची मुलगी देबस्मिता हिचा मृत्यू झाला.
 
पत्नीसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता
गणेशचा त्याची पत्नी देबस्मितासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने एका सर्पमित्राकडून विषारी साप खरेदी केला होता. 6 ऑक्टोबर रोजी त्यांनी साप प्लास्टिकच्या बॉक्समध्ये आणला आणि पत्नी आणि मुलगी झोपलेल्या खोलीत सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही साप चावल्याने मृतावस्थेत आढळले.
 
गुन्ह्याची कबुली दिली
गंजम पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता, परंतु तरुणाच्या सासरच्यांनी हत्येचा आरोप केल्यानंतर एफआयआर दाखल केला. यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आली. काही पुरावे सापडल्यानंतर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.