रविवार, 27 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 एप्रिल 2025 (21:02 IST)

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

abu azmi
Maharashtra News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा गदारोळ निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, त्यांनी हत्या करण्यापूर्वी धर्म विचारला, आता हिंदूंनीही काहीही खरेदी करण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला पाहिजे. नितेश राणे यांच्या या विधानावर महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू इच्छितो की तुमचे मंत्री नितेश राणे दररोज संविधानाचे उल्लंघन करून मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला दिसत नाही का?
अबू आझमी म्हणाले की, जर पहलगाममधील दहशतवाद्याने धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळीबार केला तर तो दहशतवादी होता. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. इथे नितेश राणे हिंदू असल्याने वस्तू खरेदी करण्यापूर्वी धर्म विचारण्याबद्दल बोलत आहे, यावर काय कारवाई करावी. असे देखील ते या वेळी म्हणाले.   
Edited By- Dhanashri Naik