शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:26 IST)

दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जण ठार

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मंगळवारी पहाटे सोलापूर- तुळजापूर मार्गावर रस्त्यावर एका कारला भरधाव प्रवासी जीपने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर मलकापूर – बुलढाणा मार्गावारही टेम्पोने रस्त्यालगत थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. तर सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.