शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (09:59 IST)

आमदार बच्चू कडू यांचा अपघात

bachhu kadu
महाराष्ट्रातील अमरावती येथील आमदार बच्चू कडू यांना त्यांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली, त्यात ते रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवाइडरला धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  
अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांना सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्यासाठी ते  रस्ता ओलांडत होते. याच दरम्यान हा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना चार टाके पडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
 
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटना वाढत आहेत.
Edited by : Smita Joshi