मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 11 जुलै 2022 (14:22 IST)

शिंदे गटातील आमदाराचा अपघात

bharat gogavle car
एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद असलेले आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला आहे. भरत गोगावले यांची गाडी फ्री वेवरून जात असताना हा प्रकार घडला. यावेळी फ्री वेवरून जात असलेल्या जवळपास 8 गाड्या एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने या अपघातामध्ये भरत गोगावले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर भरत गोगावले मंत्रालयात दाखल झाले आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीचाही अपघात झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर ते पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले.
 
यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला होता. यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागून जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने हा प्रकार घडला होता.
 
भरत गोगावले हे शिवसेनेच्या कोकणातील प्रमुख आमदारांपैकी एक आहेत. शिंदे गटाच्या इतर आमदारांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसवर दोषारोप करत भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. आगामी मंत्रिमंडळात किंवा महामंडळांच्या वाटपात भरत गोगावले यांना एखादी महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.