शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (21:08 IST)

बलात्काराच्या घटनांत राज्य चौथ्या क्रमांकावर, जयंत पाटीलांची माहिती

jayant patil
राज्यातील बलात्काराच्या घटनांत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटनांत आपले राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर राहील. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या देशात भारतात पहिल्यादांच राम अवतरत आहे की काय असे वातावरण आहे.

रामावर एवढेच प्रेम असेल तर सीतामाईचे संरक्षण करा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी भाजपवर निशाणा साधला आहे. वाढत्या महिला अत्याचारावर चिंता व्यक्त करताना ड्रग्जच्या प्रकरणावर देखील टिप्पणी केली आहे. सध्या उडता पंजाब, उडता महाराष्ट्र झालाय, असे ते म्हणाले.
 
जयंत पाटील म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो.आता आपल्या राज्यात ती स्थिती आली आहे. घटना घडली तर गुन्हा दाखल करायचा नाही. गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या उडता महाराष्ट्र झाला आहे. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला अ‍ॅडमिट करतो, नंतर त्याला पळून जायला मदत करतो.. ही गुन्ह्याची स्थिती आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor