बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जून 2023 (07:58 IST)

बेलगाम, बेजबाबदार किती बोलबे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. यावेळी बोलताना सत्ताधारी आणि विरोधक यांची जीभ घसरली आहे. यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलयं. दरम्यान,  पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज कोल्हापुरात जन्मस्थळी दीपक केसरकर यांच्याकडून लोकराजाला अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
यावेळी बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, संजय राऊत ज्याप्रमाणे बेलगाम बोलत होते तसेच बेलगाम आता आदित्य ठाकरे बोलत आहेत.बेलगाम, बेजबाबदार किती बोलबे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे. कशारीतीने बोलावे याच्या मर्यादा कोणीही सोडू नये अन्यथा आम्ही जी बांधणे घातली आहेत ती बंधने मुक्त होतील. मी सर्व उत्तरे उद्या देईन.सर्वांची उत्तरे देईन. ज्या पद्धतीने खोटे आरोप केले जातात हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही.त्याची सडेतोड उत्तरे द्यायलाच हवी, तरच महाराष्ट्राची वैचारिक परंपरा टिकू शकेल, अशी प्रतीक्रिया केसरकरांनी दिली.