रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (08:07 IST)

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती राहुल कनाल हे देखील येत्या 1 जुलैला शिंदे गटात

rahul kanal
ठाकरे गटाकडून आऊटगोईंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या आमदार असलेल्या मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. परंतु त्यांना काही दिवसच पूर्ण होत नाहीत. तोवर ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती राहुल कनाल हे देखील येत्या 1 जुलैला शिंदे गटात जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का मानावा लागणार आहे.
 
राहुल कनाल 1 जुलैला शिंदे गटात
एकीकडे 1 जुलैला मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटात राहुल कनाल जाणार असून ठाकरेंना मोठा झटका बसणार आहे. आदित्य ठाकरेंचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य 1 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
 
राहुल कनाल यांनी महिन्यापूर्वीच युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहुल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे.
 
मनीषा कायंदे यांचा शिवसेना प्रवेश
ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी 18 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधानपरिषद सदस्य व शिवसेना पक्षप्रवक्ता मनीषा कायंदे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय कशासाठी घेतला, याबाबत त्यांनी मोठा खुलासा केला.
 
Edited By - Ratnadeep ranshoor