सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (12:54 IST)

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक

वाढदिवसाचा केक चाकूऐवजी तलवारीने कापण्याची क्रेझ तरुणांना वाढत आहे. पण हा शौक बर्थडे बॉय महागात पडला. औरंगाबाद शहरात पोलिसांनी बर्थडे बॉयला तलवारीने केक कापल्यामुळे अटक केली आहे. तरुणाच्या वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापल्याचा गुन्हाही पोलिसांनी दाखल केला आहे.
 
औरंगाबाद शहरातील जुना मोंढा परिसरात घडलेल्या या प्रकारात धारदार तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. 22 इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या आरोपीने वाढदिवसाचा केक कापला होता. तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ तरुणाने स्टेटसवर ठेवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. 
 
या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तलवारीने केक कापून त्याचे स्टेटस ठेवल्यामुळे परिसरात खळबळ पसरली होती. फुटेजमध्ये तलवारीने चार केक कापणाऱ्या हर्षद गोरमे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी अनेकांनी ऑनलाइन वेबसाइटवरून तलवारी खरेदी केल्या होत्या.