शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (11:11 IST)

15 डिसेंबरपासून मुंबई, पुण्यात शाळा सुरू करण्यावर पुनर्विचार

राज्यात कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत विचार होत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शालेय विभागाचे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष आहे. आपापर्यंत अनेकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी स्थानिक जिल्हा आणि पालिका प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आताही शाळा सुरू करायची की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासनालाच दिले आहेत. येणार्‍या काळातील परिस्थिती घेऊनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णये घेऊ असे ही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.