1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (11:25 IST)

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

Dagdusheth Halwai Ganpati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
 
सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे संचालकही होते. गेल्या काही दिवसांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर दोन आठवड्यांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.