गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (09:36 IST)

'गुलाब' नंतर आता 'शाहीन' कहर माजवेल, नवीन चक्रीवादळामुळे IMD ने महाराष्ट्र आणि गुजरातला सतर्कते चा इशारा दिला

'गुलाब' चक्रीवादळाचा(Gulab Cyclone) कहर अजून थांबलेला नाही की नवीन चक्रीवादळ 'शाहीन' (Shaheen Cyclone) च्या येण्याच्या शक्यतेने  लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. हे वादळ विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांसाठी चिंतेचे कारण बनत आहे.याचे कारण म्हणजे 'शाहीन' नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होणार असून महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव दिसून येईल.
 
सध्या 'गुलाब' चक्रीवादळाने महाराष्ट्रात उच्छाद मांडला आहे.'गुलाब' वादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले आहे.हे छत्तीसगड आणि ओडिशाच्या दक्षिणेकडील भागात गेले आहे.या मुळे सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार ते अतिवृष्टी होत आहे.फक्त मराठवाडा येथे 10 लोकांनी आपला जीव गमावला आहे.अनेक गुरे,दुकाने वाहून गेली आहेत.पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिल्ह्यांमध्ये गुलाबांच्या कहराचा भयानक परिणाम चहुबाजूंनी दिसून येतो. नदी,नाले,तलाव,हाट,फूटपाथ,रस्ते,गाव,शहर,दुकान,घर,सर्वत्र पाणी भरले आहे.पिके नष्ट झाली आहेत,अनेक पुलांवर पाणी ओसंडून वाहत आहे.नद्यांना पूर आला आहे.लोकांना घरात पाणी शिरल्यामुळे पुन्हा एकदा घराच्या छतावर यावे लागत आहे. येत्या 48 तासांमध्ये 'गुलाब' चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येईल.काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस पडेल.इतक्या विध्वंसानंतर आता 'शाहीन' वादळाच्या आगमनाच्या बातमीने अंत:करणात भीती निर्माण केली आहे.

येत्या 24 तासांत गुलाब चक्रीवादळाची तीव्रता जास्त असेल. या तासांमध्ये भारतीय हवामान विभागाने (IMD) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.ही वादळ पुन्हा एकदा नव्या रूपात समोर येणार आहे ही चिंतेची बाब आहे. म्हणजेच एका नवीन चक्री वादळाचं जन्म होणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
 
अरबी समुद्रात हे वादळ तयार होईल. या चक्रीवादळाला 'शाहीन' म्हटले जाईल. हे नाव ओमान देशाने दिले आहे. या वादळाच्या तयारीशी संबंधित प्रत्येक छोट्या -मोठ्या विकासावर तज्ञ लक्ष ठेवून आहेत.अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचेल. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार ते 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. येथे आल्यावर ते नवीन स्वरूपात बदलेल. हे चक्रीवादळ तुफानी बनून महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवर त्याचा प्रभाव दाखवेल.
 
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, शाहीन नावाचे हे नवीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार नाही. हे 1 ऑक्टोबर रोजी ओमानच्या दिशेने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून दूर जाईल.परंतु यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल.म्हणजेच पावसाचा जोर अजून काही दिवस कायम राहणार आहे.
 
यापूर्वीही 2018 मध्ये 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान 'गाझा' नावाचे चक्रीवादळ आले होते.15 सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात ते कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले.यानंतर, हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीच्या पृष्ठभागावरून अरबी समुद्राकडे सरकले आणि तेथे पुन्हा एकदा नवीन चक्री वादळ आले.