शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:36 IST)

छगन भुजबळांविरोधातील तक्रार प्रकरण: आमदार सुहास कांदेंना छोटा राजन गँगचा कॉल

नांदगाव डीपीडीसीच्या निधी वाटपावरून सुरु झालेला सुहास कांदेविरुद्ध छगन भुजबळ वादाने वेगळे वळण घेतले आहे.आमदार कांदे यांना त्यानी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी मुंबईहून फोन आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.नाशिकला गंगापूर पोलिस ठाण्यात आमदार कांदे यांनी तक्रार अर्ज केला असून त्यात कोर्टात केलेली याचिका मागे घ्या असा छोटा राजनच्या पुतण्याने फोन केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. आमदार कांदे यांनी पोलिस आयुक्तांकडेही तक्रार अर्ज केला आहे.
 
भुजबळांच्या डीपीडीसीतील निधी वाटपावर संशय व्यक्त करीत, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपातील अन्यायविरोधात आमदार कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नांदगाव मतदारसंघाच्या विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळयांनी निधीचा वापर व्यवस्थित केलेला नाही.तसेच १० कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप केला होता.
 
दरम्यान त्यानुसार ही उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे यांने ९६६४६६६६७६ या क्रमांकावरून दुरध्वनी केला. हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असे धमकावले असे नाशिक पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.