बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (21:45 IST)

आता शिवभोजन थाळीसाठी पैसे मोजावे लागणार

कोविड काळात राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोना काळात गरजुंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला होता. 30 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकाराने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. 
 
पण आता शिवभोजन थाळीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. शिवभोजन थाळीचं मोफत वितरण बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शिवभोजन थाळीसाठी पूर्वीप्रमाणे 10 रुपये प्रति थाळी दर आकारला जाणार आहे.
 
कोरोना काळात शिवभोजन केंद्रांना प्रतिदिन दीडपट मोफत थाळी वितरण करण्याचं उद्दीष्ट्य देण्यात आलं होतं. तेही आता पूर्ववत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे शिवभोजन केंद्रातून देण्यात येणारी पार्सल सुविधाही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
राज्यात ब्रेक द चेन अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केलं होतं. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरू होती.