मुक्त विद्यापीठातर्फे आता स्पर्धा परीक्षांचे धडेही दिले जाणार
ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आता स्पर्धा परीक्षांचे धडेही दिले जाणार आहेत.या विद्यापीठाने स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबई व दिल्ली जाण्याची गरजही भासणार नाही.नाशिकमध्ये युनिव्हर्सल फाऊंडेशनमध्ये मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सुरु करण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठ व युनिव्हर्सल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिक्षणक्रम तयार करण्यात आला आहे. यात एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.नाशिकमध्ये युनिव्हर्सल फाऊंडेशन येथेही विद्यापीठाचे केंद्र आहे.सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतच्या याअभ्यासक्रमासाठी मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रवेश घेता येईल.