शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (21:38 IST)

अनिल परब यांची ईडीकडून तब्बल सात तास चौकशी

शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांना ईडीने (ED) समन्स बजवला होता. त्यानंतर ते  अनिल परब हे ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीकडून तब्बल सात तास अनिल परब यांची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी सात वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. 
 
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांना आपण उत्तर दिल्याचं म्हटलं. 'आज मला जे समन्स आलं होतं, त्या समन्सच्या अनुषंगाने मी ईडी कार्यालयात आलो, आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. ईडी ही एक अॅथोरिटी आहे, आणि अॅथोरिटीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
 
मी सहकार्य करणार, कारण मला प्रश्न विचारण्याचा अधिकार अॅथोरिटीला आहे, कोणा एका व्यक्तीला नाही, आणि म्हणून अॅथोरिटी जे प्रश्न विचारेल त्याला उत्तरं दिली आहेत असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.