गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (21:15 IST)

संजय राऊतांनंतर आता ‘या’ नेत्यावर ईडीची कारवाई,संपत्ती केली जप्त

After Sanjay Raut
शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP sanjay raut) यांच्यावर ईडीने कारवाई करत अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त केली. हे प्रकरण ताजे असताना आता राज्यातल्या आणखी एका नेत्यावर ईडीने कारवाई केली आहे. नेमके हे नेते कोण आहेत, ते पाहूयात..
 
ईडीने आज दोन वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या संपत्या जप्त करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचे प्रकरण ताजे असताना, दुसरीकडे ईडीकडून ‘आप’च्या नेत्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.आपचे नेते सत्येंद्र जैन यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणात आपचे नेते सत्येंद्र जैन यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.