मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (16:10 IST)

स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही : संजय राउत

कोकणातील नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला हलवण्यात यावा अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रत्नागिरीतील स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. राज्याच्या आणि देशाच्या विकासाला खिळ बसेल अशी भूमिका शिवसेनेची नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊतांनी नाणार रिफायनरीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्या प्रकल्पाला किंवा कोणत्या विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होत आहे. तिकडची शेती, फळबागा, समुद्र, मच्छिमार समाज यांचा विरोध प्रकल्पाला आहे.

कारण या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, शेती आणि फळबागा नष्ट होतील. यासाठी त्यांचे आंदोलन तेव्हासुद्धा सुरु होते आणि आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही. याचा अर्थ तो प्रकल्प होऊ नये असे नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.