महाविकास आघाडी आक्रमक; विधानभवनाच्या पायर्यांवर ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…
नागपूर – राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसर दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन केले.
Edited By - Ratnadeep Ranshoor