बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (15:43 IST)

ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राड्यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

death
आज ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आहे. राज्यात विविध जिल्ह्यात विजय आणि पराभवाचे निकाल ऐकू येत असताना जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील टाकळी येथे दोन गटांमध्ये निकालानंतर राडा झाला. त्यात दगडफेक केली गेली. दगडफेकीत एका भाजप कार्यकर्त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 
टाकळी ग्राम पंचायतीचा निकालानंतर दोन गट आपसात भिडले त्यात काही जणांनी दगडफेक केली गावात दंगलसारखी स्थिती बनली. या दगडफेकीत भाजपच्या धनराज श्रीमाळी या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. 
जामनेर तालुक्यात ग्राम पंचायतीवर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असून विजय मिरवणूक काढत  विजयी उमेदवाराने गावात प्रवेश केल्यावर पराभव झालेल्या पक्षाच्या काही लोकांनी दगडफेक केली त्यात भाजपच्या कार्यकर्ते धनराज श्रीमाळी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit