शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (11:15 IST)

कोल्हापुरात वरातीत नवरदेवाने केला हवेत गोळीबार

सध्या लग्न समारंभात काही हटके करण्याची पद्धत जोमानं सुरु आहे. लग्न करणारे जोडपे काही हटके करण्यासाठी असे काही करतात की ते नेहमीसाठी लक्षात राहावे. या साठी ते उत्साही असतात. आणि आधुनिकता आणि काहीसे वेगळे करण्याच्या नादात कधी कधी असे काही करून बसतात ज्यामुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. असे काहीसे घडले आहे कोल्हापुरात. लग्न म्हटले की घरात आनंददायी आणि उत्साही वातावरण असते. पाहुण्याची लगबग सुरु असते. कोल्हापुरच्या करवीर तालुक्यात सडोली येथे लग्नात नवरदेवाने काहीसे हटके करण्याच्या नादात चक्क हवेत गोळीबार केला. या प्रकरणी नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना 15 डिसेंबरची असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील करवीर तालुक्यात सडोली येथे अजय कुमार पवार याचे 15 डिसेंबर रोजी लग्न होते. वरात निघाली असून वरातीत वऱ्हाडी डीजेच्या तालावर नाचत होते. नवरदेवाला काही जणांनी आपल्या खांद्यावर उचलले असून नवरदेवाच्या हातात बंदूक असून त्याने उत्साहात हवेत गोळीबार केला. वरातीत नाचणाऱ्यांपैकी कोणीतरी याचे व्हिडीओ बनवले जे सोशल मीडियावरवेगाने व्हायरल झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव अजय कुमार पवारच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
 
 
Edited By- Priya Dixit