शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (09:25 IST)

Gram Panchayat Election2022 :ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज

voting
राज्यातील 7  हजार 135 ग्राम पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार. सकाळी 10 वाजे पासून मतमोजणीला सुरुवात होईल. आज मतदार राजा कोणाच्या हाती सत्ता देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आला आहे. आपला प्रतिनिधी निवडून येण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात यंदा शिंदे सरकार झाल्यावर पुन्हा थेट सरपंच निवडचा नियम लागू केल्या मुळे ग्राम पंचायत सदस्यांसह सरपंचाची निवड थेट होणार. गावागावात ग्राम पंचायत निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 
 
यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287,लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240 , अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475  7751 अशा निवडणूक असलेल्या ग्राम पंचायतीची एकूण संख्या आहे. कोणाचा हाती ग्राम पंचायत येईल यांचावर सर्वांचे लक्ष लागले असून निकालाची वाट पाहत आहे.  
 
Edited By- Priya Dixit