बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 डिसेंबर 2022 (12:12 IST)

Gram Panchayat Election 2022 : राज्यात आज सात हजाराहून अधिक ग्राम पंचायतीसाठी मतदान

voting
राज्यात आज 18 डिसेंबर रोजी ग्राम पंचायतीच्या सदस्य पदांसह थेट सरपंचाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.  मतदानाला सकाळी 7 : 30 वाजल्यापासून सुरुवात झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यात 7 हजार 751 ग्राम पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरु  आहे. 
गावागावात ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदान यंत्रणेत अधिकारी आणि कर्मचारी देखील हजारोच्या संख्येत आहे. 

पालघर जिल्ह्यात पहिल्या 2 तासात 14.21 टक्के मतदान. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या राहुल लोणीकर यांनी लोणी या गावी मतदान केले. कोल्हापुरात बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव वरातीने मतदानाचा हक्क बजावला.आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदान केले.
आज अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत  ग्रामपंचायती मतदार राजा कुणाच्या हाती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 
Edited By - Priya Dixit