गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 18 डिसेंबर 2022 (11:36 IST)

पालघर हादरलं ! 16 वर्षाच्या मुलीवर 11 नराधमांकडून सामूहिक अत्याचार

rape
16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 11 नराधमांकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. नशेत असलेल्या 11 जणांनी अल्पवयीन मुलीवर माहीमच्या निर्जन बंगल्यावर नेऊन रात्रभर सामूहिक अत्याचार केले. पीडित मुलगी माहीम येथे राहते. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला 16 डिसेंबर रोजी आरोपींची माहीमच्या निर्जन बंगल्यावर नेले आणि सामूहिक तिच्यावर बलात्कार केला. नंतर मुलीला माहीम बीचवर नेल्यावर तिच्यावर आळीपाळीने रात्रभर अत्याचार केला. नंतर मुलीने घडलेली घटना माहीम पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सामूहिक बलात्कार म्हणून नोंद केली असून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील 6 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेने पालघर हादरलं आहे. 
 
Edited By - Priya Dixit