बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (22:05 IST)

देवेंद्रजी मविआचा मोर्चा पॉवरफुल, ड्रोन शॉट काढून एकदा पाहाच

devendra fadnavis
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. या मोर्चानंतर मविआचा आजचा महामोर्चा हा नॅनो मोर्चा होता,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यानंतर आता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
 
अमोल मिटकरी ट्विट करत काय म्हणाले,
देवेंद्रजी महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा एकंदरीत पॉवरफुल झालाय. त्याचा ड्रोन शॉट एकदा वेळेनुसार बघुन घ्याल. तुमचा जळफळाट आम्हीं समजु शकतो.cool down असे म्हणत मिटकरींनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मिटकरींनी व्हिडिओ शेअर करत फडणवीसांना टॅग केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या टीकेला फडणवीस नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor