चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली होती. त्यानंतर नाना पटोले हे चित्रा वाघ यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत.