गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 17 जुलै 2022 (11:48 IST)

Viral Video 'जुगाड' लोकल ट्रेनमध्ये चक्क वाळत टाकले कपडे

mumbai rain clothes in local train
मुंबईतील पाऊस आणि त्याचा मुंबईकरांवर होणारा कहर जगभरातील लोकांना माहीत आहे. पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळतो, पण सोबत अनेक समस्याही येतात. त्यातील एक मुद्दा म्हणजे कपडे सुकवण्याचा. मात्र, यातूनही मुंबईकरांनी मार्ग काढला आहे. ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये एक किंवा दोन कपडे लटकताना आणि सुकताना दिसत आहेत. होय, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःच पाहू शकता.
 
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दादर मुंबईकर नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. छोट्या क्लिपमध्ये लोकल ट्रेनमध्ये टॉवेल, शाल आणि काही कपडे सुकताना दिसतात. याशिवाय प्रवासी जराही त्रस्त झालेले दिसले नाहीत आणि काही झालेच नसल्यासारखे बसले.
 
हा व्हिडिओ 1 लाखांहून अधिक वेळा ऑनलाइन पाहिला गेला आहे आणि लोक व्हिडिओवर अनेक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट विभाग हसणाऱ्या इमोजींनी भरला होता आणि आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसायला येईल.