रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:08 IST)

RTE प्रवेश तिसऱ्या टप्प्याची मुदत संपली

राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीई प्रवेशाच्या पंचवीस टक्के राखीव जागांवर तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया संपली आहे; पण प्रवेश प्रक्रियेनंतरही राज्यात तब्बल 23,464 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त जागांची संख्या मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
मुंबईसह राज्यातील खासगी शाळांमध्ये रिक्त जागांची आणि एकूणच होत असलेल्या प्रवेशांच्या अडचणीचा आढावा सोमवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून घेतला जाणार आहे. त्यानंतरच रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश कोणत्या पद्धतीने करायचे, याचा निर्णय घेतला जाईल.
 
मागील दोन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची ही प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या प्रवेश फेरीनंतर खूप मोठ्या प्रमाणात आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्यानंतर तीन प्रवेश फेऱ्या आयोजित करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न केला. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.