शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (16:10 IST)

नांगरलेल्या शेतात आढळून आले मृत अर्भक !

नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळून आले असल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर घडली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले काही तरी असल्याची माहिती जमीन मालकांना काही नागरिकांनी दिली.
त्यांनी प्रत्यक्ष जाऊन खात्री केल्यानंतर लोणी पोलिसांना कळवले. पोलिसांनी एका कपड्यात गुंडाळलेले अर्भक ताब्यात घेऊन ते प्रवरा रुग्णालयात नेले.
मात्र तेथील डॉक्टरांनी अर्भक असल्याचे स्पष्ट केले खरे पण ते कुजलेले असल्याने स्त्री की पुरुष याची स्पष्टता केली नाही. हे अर्भक आठ ते दहा दिवसापूर्वी टाकलेले असावे, असा पोलिसांना संशय आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अर्भक पूर्ण दिवसाचे आहे व प्रसुतीनंतर लगेच ते टाकून दिले असावे. ही स्त्री भ्रूणहत्या असावी अशीही शंका घेतली जात आहे. मात्र लोणीचे पोलीस कसून तपास करीत आहेत.
==========================================