गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (19:59 IST)

अहमदनगर: अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, राज्य सरकारचा निर्णय

आज देवी अहिल्याबाई जयंती साजरी केली जात आहे.राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात चौंडी येथे देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही अहिल्याबाई यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन काम करतो. आता लवकरच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. नाव बदलण्याच्या निर्णय घेणं आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.  
 
आम्ही या सोहळ्याचे साक्षीदार आहोत.आम्हाला याचा अभिमान आहे. नगरचे नामांतर केल्यामुळे त्याचा मान वाढणार आहे. अहिल्यादेवी होळकरांनी मोठे मोठे कार्य केले. त्यांचं कार्य हिमालया एवढं मोठं आहे. त्यांना वंदन करून राज्य सरकारने अहमदनगरचं नामांतरण करून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली होती की अहमदनगरचे नामांतरण करून अहिल्यानगर करावे. 
 
 
Edited by - Priya Dixit